Politics : दसरा मेळाव्यापूर्वीच न्यायालयाने मिटविला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, नेमका कसा?
कोर्टाच्या निर्णयानंतर दसरा मेळाव्याचे चित्र स्पष्ट झाले असले तरी त्यावरुन आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहेत. कायदा-व्यवस्था सुरळीत राहवा याअनुषंगाने कोर्टाने हा निर्णय दिल्याचे कॉंग्रस नेत्याने म्हटले आहे.
नागपूर : शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा (Dussehra Rally) होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, मध्यंतरी शिंदे गटाकडून (Eknath Shinde) आणि महापालिकेकडून यामध्ये जो अडथळा आणण्यात आला त्याचा समाचार आता विरोधक घेऊ लागले आहेत. मध्यंतरी कोणी राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा कोणी प्रश्न निर्माण केला याची जाणीव कोर्टाला असावी म्हणूनच कोर्टाने शिवसेनेला परवानगी दिल्याचे म्हणत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. शिंदे गटाला परवानगी दिली असती तर पुन्हा राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर दसरा मेळाव्याचे चित्र स्पष्ट झाले असले तरी त्यावरुन आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहेत. कायदा-व्यवस्था सुरळीत राहवा याअनुषंगाने कोर्टाने दिलेला निर्णय योग्यच असून त्याचे स्वागत केले जाणार असेही नाना पटोले म्हणाले आहेत.
Published on: Sep 23, 2022 06:11 PM
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं