AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uttamrao Jankar : मतदारसंघात मत चोरी कशी झाली ? जानकरांनीच केला खुलासा

Uttamrao Jankar : मतदारसंघात मत चोरी कशी झाली ? जानकरांनीच केला खुलासा

| Updated on: Nov 01, 2025 | 3:12 PM
Share

आमदार उत्तम जानकर यांनी माळशिरस मतदारसंघात ईव्हीएमद्वारे 1 लाख मतांची चोरी झाल्याचा आरोप केला आहे. विजयानंतरही मतदारांनी शंका व्यक्त केल्याने मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर मतदानासाठी प्रयत्न झाला.

माळशिरस मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मत चोरी झाल्याचा गंभीर आरोप आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. सत्याचा मोर्चादरम्यान बोलताना जानकर यांनी सांगितले की, निवडणुकीत विजयी होऊनही त्यांच्या तालुक्यातून तब्बल 1.08 लाख मते ईव्हीएमद्वारे ट्रान्सफर झाली. हा निकाल पाहिल्यानंतर सर्वसामान्य माणसाला आणि कार्यकर्त्यांना धक्का बसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अनेक निवडणुकीतील पराभवानंतर विजय मिळवूनही लोकांनी सत्कार करण्याऐवजी आमच्या गावात असे घडू शकत नाही अशी भावना व्यक्त केल्याचे जानकर यांनी सांगितले.

या प्रकारानंतर मार्कडवाडी गावातील लोकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी बॅलेट पेपर छापून मतपेट्या तयार केल्या आणि मतदानाचा दिवस निश्चित केला. परंतु, मतदानाच्या दिवशी मोठ्या संख्येने पोलीस गावात दाखल झाले. त्यांनी गावातील लोकांना दहशत निर्माण करत मतदान होऊ दिले नाही. या प्रकरणी उत्तम जानकर यांच्यासह १०० लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. महाराष्ट्राने हा प्रकार पाहिला असल्याचे जानकर यांनी नमूद केले.

Published on: Nov 01, 2025 03:12 PM