Pune हादरलं… तो घरात घुसला, तरूणीवर रेप केला.. यावरच तो थांबला नाही, सेल्फी काढला अन् म्हणाला मी पुन्हा…
कोंढवा पोलीस स्थानक हद्दीत 22 वर्षीय महिलेवर डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून अत्याचार केलाय. महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून महिलेला बेशुद्ध करण्यात आले. बेशुद्ध करून अत्याचार केल्यानंतर पीडित महिलेचा मोबाईलमध्ये आरोपीने फोटो काढत मी पुन्हा येईल असं लिहिलंय.
पुण्यातील कोंढवा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीमधील तरूणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. आरोपीने कुरिअर बॉय असल्याचे सांगून एका उच्चभ्रू सोसायटीत प्रवेश केला. संतापजनक म्हणजे या आरोपीने तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर नराधमाने मोबाईलमध्ये सेल्फीही काढला आणि मी पुन्हा येईन असंही त्या फोटोला कॅप्शन दिलं. दरम्यान, हा कुरिअर बॉय जेव्हा या तरूणीच्या घरी कुरिअर देण्यास आला तेव्हा त्या तरूणीने ते आपलं नसल्याचे सांगितले. तरीही या नराधमाने तिला सही करावी लागेल असं सांगितले. यावेळी पीडित तरूणी घरी एकटीच असल्याचे हेरून त्याने तिच्याकडून पेनची मागणी केली. सेफ्टी डोअर ओपन केला तेवढ्यात आरोपीने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध केलं. यानंतर आरोपीनं घरात घुसून तरूणीवर लैंगिक अत्याचार केले.