Thackeray Brothers : 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा, व्यासपीठावर कोणाला स्थान? अशी असणार रुपरेषा
मुंबईतील वरळी डोम येथे ५ जुलै रोजी होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका नुकतीच समोर आली होती अशातच आता थेट वरळी डोममध्ये होणाऱ्या मेळाव्याची रूपरेषाच समोर आली आहे.
अवघ्या दोन दिवसांवर ठाकरे गटाचा विजयी मेळावा आल्याने ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून जोरदार तयारी सुरू असून की अंतिम टप्प्यात आली आहे. वरळी डोम येथे होणारा मेळावा हा कसा नियोजनबद्ध होईल याची देखील जबाबदारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतली असून या कार्यक्रमाची रूपरेषा आता समोर आली आहे. दरम्यान व्हायरल होणाऱ्या निमंत्रण पत्रिकेत महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी बोलताना पहायचा आहे? मग ही सुरूवात असल्याचं ठाकरे बंधूंनी म्हटलंय. तर या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहनही करण्यात आलंय. अशातच आता या विजयी मेळाव्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा समोर आली असून मेळाव्याच्या दिवशी व्यासपीठावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ हे विराजमान होणार आहे. यासह वरळी डोममध्ये जवळपास ७ ते ८ हजार लोक बसण्याच्या व्यवस्थेसह हॉलमध्ये- बाहेर आणि रस्त्यावरही LED स्क्रीन लावण्यात येणार आहे.