धक्कादायक! चक्क बँकेतूनच मिळाल्या 100 रुपयांच्या बनावट नोटा, कुठं घडला प्रकार?
VIDEO | बँकेतून 10 हजार रुपये काढण्यासाठी गेलेल्या एका ग्राहकाला 100 रूपयांच्या बनावट नोटा मिळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, बँक व्यवस्थापकानं बनावट नोटांबाबत पोलिसात दाखल केली तक्रार
भंडारा, १२ ऑगस्ट, २०२३ | भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील इंडियन ओवरसीज बँकेतून 10 हजार रुपयांची विड्रोल केलेल्या एका ग्राहकाला 100 रूपयांच्या चार बनावट नोटा मिळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तुमसर येथील साई महाविद्यालयातील विद्यार्थी असून त्यानं प्रवेश फी भरण्यासाठी इंडियन ओवरसीज बँकेतील आपल्या खात्यामधून पैसे काढले आणि ते पैसे घेऊन कॉलेजमध्ये जमा करण्याकरिता गेला असता ते 100 रुपयाच्या 4 नोटा नकली असल्याचं महाविद्यालयातील कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर तो कर्मचारी विद्यार्थ्यासह बँकेत गेला असता बँक व्यवस्थापक आणि रोखपालानं उडवाउडवीची उत्तरे देवून बनावट नोटा तात्काळ बदलून देत परतवून लावले. मात्र, याबाबत बँक व्यवस्थापकानं बनावट नोटांबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आणि बनावट नोटांबाबत अधिक चौकशी होणे गरजेचे असताना, बँक व्यवस्थापकांनी प्रकरण लागलीच मिटवून सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं बँक अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरचं आता संशय निर्माण होतोय. याबाबत बँक व्यवस्थापक खुराणा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
