VIDEO : Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 4 PM | 16 July 2021

मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळाला. पावसामुळे शहर आणि उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. साचलेल्या पाण्यातून चालताना अंदाज न आल्यामुळे अंधेरी भागात एक पादचारी महिला पाय अडकून पडली.

मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळाला. पावसामुळे शहर आणि उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. साचलेल्या पाण्यातून चालताना अंदाज न आल्यामुळे अंधेरी भागात एक पादचारी महिला पाय अडकून पडली. सुदैवाने एका महिलेने वेळीच सावरल्याने ती मॅन होलमध्ये पडता-पडता बचावली. अंधेरीतील डीएन नगर परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे. मुंबईतील अनेक भागात गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी सकाळीही पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. पावसाचा जोर ओसरल्यानंतरही पाणी कायम होतं. त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत जावं लागलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI