मुलीने डॉक्टर होण्याचं स्वप्न, नीटमध्ये मिळाले कमी गुण; त्यानंतर वडिलांनी जे केलं ते..
सांगलीच्या आटपाडी येथील नेलकरंजीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सांगलीत मुलीला वडिलांकडून अमानुष मारहाण करण्यात आली आहे. मुख्याध्यापक पित्याने केलेल्या या अमानुष मारहाणीत या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर वडील धोंडीराम भोसलेला आटपाडी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने ही मारहाण केल्याचं समोर आलं आहे.
सांगलीच्या आटपाडी येथील नेलकरंजीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनी मुलीला केलेल्या अमानुष मारहाणीत तिचा मृत्यू झाला आहे. भोसले यांची मुलगी वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तयारी करत होती. तिला डॉक्टर करण्याचे कुटुंबीयांचे स्वप्न होते. यासाठी खाजगी शिकवणी लावली होती. त्या शिकवणीत सराव परीक्षा झाली आणि त्या सराव परीक्षेत तिला कमी गुण मिळाले त्यामुळे वडील धोंडीराम चिडले आणि त्यांनी मुलीला मारहाण केली. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

