आधी जीवेमारण्याची धमकी आता गोळीबार, सलमान खानच्या घराबाहेर काय घडलं? Exclusive व्हिडीओ समोर
वांद्रे येथील सलमान खानच्या घराबाहेर आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. बाईकवरून आलेल्या दोघांकडून सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. याच फुटेजच्या माध्यमातून आरोपांना शोधण्याचा प्रयत्न सुरू
सलमान खान संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील वांद्रे येथील सलमान खानच्या घराबाहेर आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. बाईकवरून आलेल्या दोघांकडून सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. याच फुटेजच्या माध्यमातून आरोपांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून चौकशीही सुरू करण्यात आली आहे. ही घटना घडली त्यावेळेस सलमान खान घरीच होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता धमकी न देता थेट घराबाहेर गोळीबार झाल्याने सलमनाचे फॅन चितेंत आहेत. गोळीबाराच्या 2-3 राऊंड फायर झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच आणि एटीएसची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. तर हल्लाखोर सलमानच्या घराबाहेर येत त्यांनी हवेत गोळीबार केला आणि तिथून पळ काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र यामध्ये कोणही जखमी झाले नाही.

'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार

'मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल', रामदास कदम भरसभेत कडाडले

'...तर धसच जबाबदार', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगे पाटलांचा हल्लाबोल

ठाकरेंच्या या 3 नेत्यांची हाकालपट्टी, शिंदेंचा 'धनुष्यबाण' हाती घेणार?
