4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 5 PM | 22 October 2021

आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅट रिकव्हर झाल्यावर अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलावले होते. आज सलग दुसऱ्या दिवशीही तिला चौकशीसाठी बोलावले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ड्रग्ज प्रकरणाबाबत एनसीबीच्या तावडीत अडकली आहे. गुरुवारी एनसीबीने आर्यन खान ड्रग्स प्रकरणाबाबत अनन्या पांडेची 2 तास चौकशी केली. एनसीबीने ड्रग्जबाबत आर्यन आणि अनन्या यांच्यातील संभाषणावर अभिनेत्रीची चौअक्षी केली. एनसीबीने अनन्याला ड्रग्जबद्दल प्रश्न विचारले.

आर्यन खान आणि अनन्या पांडेच्या गप्पांमध्ये आर्यन अनन्याशी एका ठिकाणी गांजाबद्दल बोलत होता. आर्यन विचारत होता की, काही जुगाड होऊ शकते का? यावर अनन्याने उत्तर दिले आणि सांगितले की, मी व्यवस्था करीन. एनसीबीने अनन्याला हे चॅट दाखवले आणि काही प्रश्न विचारले, ज्यावर अनन्या म्हणाली की, ती फक्त विनोद करत होती. अनन्या पांडेने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की आर्यनशी तिच्या गप्पा ड्रग्सबद्दल नाही तर सिगारेटबद्दलच्या आहेत. दोघांमध्ये सिगारेटबद्दल संभाषण झाले होते. अनन्याने सांगितले की, तिने कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI