Pune Leopard Attacks : बिबट्या दिसला की थेट गोळ्या घाला, वनमंत्र्यांचे फर्मान, आता मानवांवरील हल्ले कमी होणार?
वनमंत्री गणेश नाईक यांनी शिरूरमध्ये बिबट्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना भेट दिली. त्यांनी पुणे आणि नगर जिल्ह्यांसाठी ११-११ कोटींच्या निधीची घोषणा केली. बिबट्या हल्ले रोखण्यासाठी चंद्रपूरच्या धर्तीवर आधुनिक तंत्रज्ञान व १२०० पिंजऱ्यांचा वापर केला जाईल. नाईक यांनी बिबट्या दिसल्यास जागेवर गोळ्या घालण्याचे निर्देश दिले.
वनमंत्री गणेश नाईक यांनी शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या रोहन बोंबे, शिवन्या बोंबे आणि भागूबाई जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. या भेटीदरम्यान त्यांनी बिबट्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी शासनाच्या उपाययोजनांची माहिती दिली. नाईक यांनी पुणे आणि नगर जिल्ह्यांसाठी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरिता प्रत्येकी ११ कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगितले. चंद्रपूरमध्ये वाघांच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी वापरण्यात आलेले सॅटेलाईट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक तंत्रज्ञान पुणे आणि नगर जिल्ह्यांत बिबट्यांसाठी वापरण्यात येणार आहे. याशिवाय, बिबट्यांना पकडण्यासाठी १२०० पिंजरे कार्यान्वित केले जातील.
यावेळी बोलताना, वनमंत्री नाईक यांनी “बिबट्या दिसला तर त्याला ऑन द स्पॉट शूट करा,” असे धक्कादायक विधान केले. लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि भविष्यात असे जीव वाचवण्यासाठी ही कठोर उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. वनखात्याला सतर्क राहण्याचे आणि वनमित्रांच्या मदतीने दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

