‘रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल, असं विशाल पाटीलचं काम…’, कोणी केली जिव्हारी लागणारी टीका?
'अपघाताने झालेला खासदार हा विशाल पाटील आहे. रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाज वाटेल असं विशाल पाटील हा सरडा जिल्ह्यात काम करतोय.', अशी जिव्हारी लागणारी टीका संजयकाका पाटील यांनी करत विशाल पाटील यांना जाहीर आव्हान देखील दिलंय.
भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर जहरी टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. रंग बदलणाऱ्या सरड्याला देखील लाजवेल,असं काम विशाल पाटील करतोय, अशा शब्दात संजयकाका पाटलांनी यांनी विशाल पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच जिल्ह्यातल्या मतदारसंघात भांडण लावण्याचे काम आणि दुसऱ्याच्या व्यासपीठावर जाऊन बेताल भाषण विशाल पाटील यांच्याकडून करण्यात येत आहेत, मात्र यापुढे विशाल पाटलांनी कोणतंही बेताल वक्तव्य करणं थांबवलं नाही तर त्याचे राजकीय आणि सगळे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा देखील माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिला आहे. तर संजयकाका पाटील हे लोकसभेला पराभुत झाल्याने वैफल्यग्रस्त झाले असून आता विधानसभेनंतर संजयकाका पाटील नगरपंचायतला उभे राहतील की काय? अशी परस्थिती झाल्याची टीका विशाल पाटील यांनी केली होती, यावरुन संजयकाका पाटील यांनी विशाल पाटलांवर जहरी टीका करत टोकाचा इशारा दिला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

