AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'पोलीस यंत्रणेची चाटूगिरी, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र...', पोलीस आमदारांची गाडी धुतानाचा व्हिडीओ व्हायरल

‘पोलीस यंत्रणेची चाटूगिरी, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र…’, पोलीस आमदारांची गाडी धुतानाचा व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Aug 29, 2024 | 3:48 PM
Share

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी एक पोलीस कर्मचारी चक्क धुवत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडीओ आपल्या फेसबुकवरुन पोस्ट केला आहे. पोस्ट केलेला व्हिडीओ हा बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकाताली असून तेथे संजय गायकवाड यांचं कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेरच हा प्रकार घडल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पोलीस आमदाराची गाडी धुतानाचा हा व्हिडीओ पोस्ट करताना महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या आणि आया बहिणीच्या सुरक्षेसाठी आहे, की आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी? असा थेट सवालच केला आहे. यासह पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध झाल्याचा गंभीर आरोपही यावेळी त्यांनी केला आहे.  या पोस्ट सोबत हर्षवर्धन सपकाळ यांनी असे म्हटले की, ”कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा! महाराष्ट्र पोलीस शर्म करो ! सदरक्षणाय, खलनिग्रहणाय हे ब्रीद अंगीकारणारी महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या व आया बहिणीच्या सुरक्षेसाठी आहे, की आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी? दोन दिवसांपूर्वी आमदारांनी असंवेदनशील वक्तव्य केले होते, मुख्यमंत्री काय शाळेत जाऊन पहारा देणार आहेत का? एस. पी. आरोपीच्या घरी जाऊन बसणार आहेत का? आज सकाळी या प्रश्नाचे उत्तर मिळाले. पोलीस आमदारांच्या गाड्या धुणार आहे . . . . ! पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना. पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा.”, अशा शब्दात हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

Published on: Aug 29, 2024 03:48 PM