‘भाजपमध्ये मन लागलं नाही अन्…’, आधी अशोक चव्हाणांसोबत भाजपप्रवेश, आता पुन्हा घरवापसी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नांदेडमध्ये राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसताय. माजी जिल्हा परिषद सदस्या आणि माजी महापौर जयश्री पावडे यांनी भाजप खासदार अशोकराव चव्हाण यांची साथ सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये घर वापसी केली आहे.
काँग्रेस मधून अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेकांनी भाजप प्रवेश केला होता, मात्र आता पुन्हा काही पदाधिकारी काँग्रेसमध्ये येत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडच्या राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या आणि माजी महापौर जयश्री पावडे यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. इतकंच नाहीतर जयश्री पावडे यांनी घरवापसी होताच काँग्रेसकडून तिकीट मागितले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रसे भाजप सोडून काँग्रेसमध्ये परतलेल्या जयश्री पावडे यांना उमेदवारी देणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपात मनही लागलं नाही आणि विचारधाराही पटली नाही, असा भाजपातील अनुभव सांगत मी माझ्या कामाच्या मिरीटवर काँग्रेस पक्षाकडे नांदेड उत्तर विधानसभेची उमेदवारी मागितल्याचे जयश्री पावडे यांनी स्पष्ट केले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

