माजी आमदाराने केला मोठा गोप्यस्फोट, भुजबळ यांनी जामीन मिळावा म्हणून…
मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत एक मोठा गोप्यस्फोट केलाय. स्वतःला जामीन मिळावा म्हणून भुजबळ यांनी काय काय केलं याचा पाढाच आमदार कदम यांनी वाचला.
पंढरपूर : 28 सप्टेंबर 2023 | विद्यमान मंत्री छगन भुजबळ आणि मी एका जेलमध्ये पावणे दोन वर्षे होतो. त्यावेळेस भुजबळांना दररोज शारीरिक त्रास होत होता. परंतु, आता तो त्रास दिसत नाही असा टोला मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी भुजबळ यांना लगावला. पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीचे त्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते. भुजबळांना त्यावेळी होणारा त्रास आता दिसत नाही. स्वतःचा जामीन करून घेण्यासाठी ते अशा युक्त्या वापरत अखेर त्यांनी पक्षावरही दबाव टाकला. स्वतःचा जामीन करून घेतला असा गोप्यस्फोट कदम यांनी केला. भुजबळ यांच्याप्रमाणे जर मी ही युक्ती केली असती तर लवकर बाहेर आलो असतो. परंतु, मी आठ वर्षे तुरुंगात होतो कारण मला निर्दोष व्हायचे होते असेही सांगायलाही ते विसरले नाहीत.
Published on: Sep 28, 2023 07:51 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
