Prakash Javadekar | महाआघाडी सरकार विरोधात प्रचंड असंतोष; कारण हे सरकार काहीच करत नाहीत-tv9
महाविकास आघाडी सरकारचं एकच कॉमन मिनिमम प्रोग्रॅम असून तो लूट लूट लुटायचं हाच आहे.
मुंबई : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) सत्तेत आल्यापासून भाजपकडून सतत टीका होत आलेली आहे. भाजपचे (BJP) अनेक नेते हे महाविकास आघाडी सरकारवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. आता याचवरून माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (former Union Minister Prakash Javadekar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या आघाडी सरकार विरोधात प्रचंड असंतोष असल्याचे म्हटलं आहे. तसेच हे सरकार काहीच करत नाही. यामुळे जनतेचा संताप यांच्यावर असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. याच बरोबर महाविकास आघाडी सरकारचं एकच कॉमन मिनिमम प्रोग्रॅम असून तो लूट लूट लुटायचं हाच आहे. तर यातून जितकं हणता येईल तितके हणायच असल्याचेही ते म्हणाले. तसेच देशातील भ्रष्टाचाराची सगळी रेकॉर्ड या आघाडी सरकारने मोडून काढल्याचेही ते म्हणाले.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

