Vaishnavi Hagawane : वैष्णवीच्या मृत्यूचं गूढ उकलणार? 9 दिवस फरार असलेल्या निलेश चव्हाणच्या नेपाळमध्ये अवळल्या मुसक्या
नऊ दिवसांपासून फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आले आहेत. पुण्यामधून पसार झालेला निलेश चव्हाण थेट नेपाळमध्ये सापडला आणि त्याच्या अटकेंनंतर वैष्णवीसोबत नेमकं काय घडलं? तिने आत्महत्या केली की मग तिचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केलाय याचा खुलासा होऊ शकतो.
२१ मे पासून फरार झालेल्या निलेश चव्हाणला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या. सहा ते सात पोलीसांची पथक निलेश चव्हाणच्या मागावर होती. वैष्णवीच्या कुटुंबियांनीच पोलीसांच्या हलगर्जीपणामुळे निलेश चव्हाण फरार झाल्याचा आरोप केला होता. त्यावरून टीका होऊ लागल्यानंतर पोलिसांनी निलेशची शोधमोहीम वाढवली आणि अखेर पुण्यातून नऊ दिवसांआधी फरार झालेल्या निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळमधून अटक केली आहे.
पोलिसांना चकवा देत निलेश चव्हाण पुण्यातून दिल्लीला कारने गेला. तिथून एका ट्रॅव्हल्सने त्याने उत्तर प्रदेशातलं गोरखपूर शहर गाठलं. त्यानंतर गोरखपूरहून नेपाळच्या बैरवा जिल्ह्यात त्याने तळ ठोकला होता. तिथल्याच एका लॉजमधून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्यात.
निलेश चव्हाण हा आरोपी हगवणे कुटुंबियाचा निकटवर्तीय आहे. वैष्णवीच्या मृत्युनंतर तिचं नऊ महिन्याचं बाळ लपवणं, बाळाला घेण्यासाठी गेलेल्या वैष्णवीच्या कुटुंबियांना बंदूकीनं धमकावणं, स्वतःच्या पत्नीसोबत शारीरिक संबंधाचे छुप्या कॅमेऱ्याने व्हिडिओ करणं, मैत्रीण करिश्मा हगवणेच्या साथीनं वैष्णवीला त्रास देणं, वैष्णवीच्या मृत्युनंतर आरोपी लता हगवणे, करिश्मा हगवणेचे मोबाईल गायब करणं असे अनेक आरोप निलेश चव्हाणवर आहेत. बघा स्पेशल रिपोर्ट
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?

