Shiv Thackeray : बिग बॉस विजेता शिव ठाकरेच्या घरी गणपतीचं आगमन
तीन तास शोधून मूर्ती ठरविली. रात्री पावणेबाराला कुर्ता आणला. छान डेकोरेशन केलं. स्वप्न मोठे आहेत. मोठ्या पडद्याची वाट पाहतोय. मोठ्या पडद्याचं स्वप्न पाहत असल्याचं शिव ठाकरे यानं सांगितलं.
अमरावती : बिग बॉस विजेता अभिनेता शिव ठाकरेच्या अमरावतीमधील घरी गणपतीचे थाटात आगमन झालं. ढोल ताशे वाजवत गणरायाचे आगमन झालं. गणपतीसाठी शिव ठाकरेने आकर्षक सजावट केली. ढोलच्या तालावर शिव ठाकरे थिरकला. हा आपला उत्सव आहे. गेली दोन वर्षे जल्लोष कमी होता. कोविडनंतर जोश, उत्साह कुठंही दाबून ठेवायचा नाही. बाप्पा आणि माझं नातं वेगळं आहे. इमोशनली अटॅचमेंट असतो. मीच नाही तर मराठीतील कलाकार बाप्पासाठी कामाला थोडं बाजूला ठेवतात. गावात जाऊन हा उत्साह साजरा करतात. आधी बाप्पा नि मग कामं असं हे नियोजन असतं, असं शिव ठाकरे म्हणाला. तीन तास शोधून मूर्ती ठरविली. रात्री पावणेबाराला कुर्ता आणला. छान डेकोरेशन केलं. स्वप्न मोठे आहेत. मोठ्या पडद्याची वाट पाहतोय. मोठ्या पडद्याचं स्वप्न पाहत असल्याचं शिव ठाकरे यानं सांगितलं.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य

