Ganesh Visarjan 2021 | लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं

लालबागचा राजा विसर्जना करता गिरगाव चौपाटीवर पोहचला असून मुंबईकरांच्या लाडक्या राजाचं विसर्जन अखेर पार पडलं आहे. आपल्या बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

‘निरोप घेतो देवा आज्ञा असावी चुकले असेल काही तर क्षमा असावी.’ असं म्हणत आज अनंत चतुर्दशी दिवशी भाविकांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला आहे. आज सर्वत्र लाडक्या बाप्पाच विसर्जन होत आहे. दहा दिवस गणेशाची मनोभावे पूजा-अर्जना केल्यानंतर आज भक्त साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतही गणेश विसर्जनाची नियमावली देण्यात आली होती. त्यानुसारच मुंबईतील सर्व गणपतींचं विसर्जन होत आहे.

मुंबईचा प्रसिद्ध लालबागच्या राजाचंही आज विसर्जन होत आहे. लालबागचा राजा विसर्जना करता गिरगाव चौपाटीवर पोहचला असून नुकतंच त्याचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी रस्त्यासह चौपाटीवरही आपल्या बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI