Ajit Pawar On CM | मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देणे हे महाराष्ट्राचं दुर्दैव, अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

Ajit Pawar On CM | मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचे टीकास्त्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोडले आहे.

कल्याण माणिकराव देशमुख

|

Aug 06, 2022 | 4:53 PM

Ajit Pawar On CM | मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचे टीकास्त्र विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी सोडले आहे. राज्य सरकारच्या निर्णयाचा खरपूस समाचार अजित पवार यांनी घेतला आहे. आता सगळे अधिकार मुख्य सचिवांनाच (Chief Secretary) द्या आणि मुख्यमंत्रीपदी तरी कशाला थांबलात असा अप्रत्यक्ष टोला ही त्यांनी यावेळी लगावला. आज शनिवार आणि उद्या रविवार असल्यामुळे याविषयीची माहिती घ्यावी लागेल. याविषयीचा अध्यादेश निघाला असेल तर माहिती नाही. पण जनतेतून निवडून आलेल्या आमदारांना मंत्रीमंडळात स्थान द्यायचे नाही आणि सर्व अधिकार अधिकाऱ्यांना द्यायचे हे महाराष्ट्राचे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. तसेच असा निर्णय झाला असेल तर मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) या प्रश्नाचे उत्तर राज्यातील जनतेला देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें