Government Hospitals : राज्याच्या सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांचे हाल होण्याची शक्यता

सर्वात मोठी औषध पुरवणारी कंपनी म्हणून हापकीन प्रसिद्ध आहे. आता पुरवठाधारांचे पैसे थकवल्यानं सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जातेय. थकीत पैसे देण्यासाठी हापकीनला 15 दिवसांची मुदत देण्यात आलीय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Sep 20, 2022 | 6:19 AM

मुंबई : राज्यातील सरकारी रुग्णालयांबाबत (Government Hospitals) महत्त्वाची बातमी समोर येते आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा (Medicines) तुटवडा होण्याची शक्यता आहे. हापकीनकडून (Haffkine) औषधांचा पुरवठा करणाऱ्यांचे पैसे थकवण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे हापकीनला औषधं न देण्याचा निर्णय पुरवठाधारांनी घेतलाय. या निर्णयाचा फटका रुग्णसेवेवर होऊन राज्यातील आरोग्य सेवा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जातेय. 15 दिवसांत थकीत पैसे देण्याची मागणी औषधांचा पुरवठा करणाऱ्या 50 पुरवठाधारांनी केलीय. विशेष म्हणजे 2019 पासून हापकीनने तब्बल 200 पुरवठाधारांचे पैसे थकवल्याचं कळतंय. सर्वात मोठी औषध पुरवणारी कंपनी म्हणून हापकीन प्रसिद्ध आहे. आता पुरवठाधारांचे पैसे थकवल्यानं सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जातेय. थकीत पैसे देण्यासाठी हापकीनला 15 दिवसांची मुदत देण्यात आलीय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें