Gudhi Padva : गुढीपाडव्याचा ठाण्यात उत्साह, गोरेगावातही ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचं स्वागत
राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह असून ठाणे आणि गोरेगावातही मोठ्या उत्साहात मराठी नववर्षाचं स्वागत करण्यात आलंय. यावेळी तरुण-तरुणींनी ढोलताशांच्या गजरात गुढीपाडव्यानिमित्त उत्साह साजरा केला.
राज्यभरात गुढीपाडव्याचा (Gudhi Padva) उत्साह असून ठाणे (thane) आणि गोरेगावातही (goregaon) मोठ्या उत्साहात मराठी नववर्षाचं स्वागत करण्यात आलंय. यावेळी तरुण-तरुणींनी ढोलताशांच्या गजरात गुढीपाडव्यानिमित्त उत्साह साजरा केला. तर विविध भागात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. तर पुणे, मुंबई, नागपूरमध्ये ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी एकत्र येत जल्लोष केला आहे. कोरोना निर्बंधांमुळे दोन वर्ष गुढीपाडवा साजरा करता आला नाही. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारे वेगळाच उत्साह दिसून येत आहे.
Published on: Apr 02, 2022 01:20 PM
Latest Videos
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग

