जे पोलीस आधी पकडायचे ते आता संरक्षण करायला माझ्या मागे असतात; शिवसेनेच्या मंत्र्याचं वक्तव्य
शिवसेनेच्या मंत्र्याने पोलीस संरक्षणावर आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर भाष्य केलंय. पाहा नेमकं वक्तव्य काय?
जळगाव : जे पोलीस आधी पकडायचे ते आता संरक्षण करायला माझ्या मागे असतात. 1990-92 मध्ये गणपती यायचे तेव्हा पोलीस मला पकडण्यासाठी माझ्या मागे असायचे. गणपती, दुर्गा, शिवजयंती असे सण आले की पोलीस मला पकडण्यासाठी मागे असायचे. पण आता बरं वाटतं, पोलिसांची एक गाडी मागे एक गाडी पुढे, काय रुबाब आहे ना! माणसाचे दिवस कसे बदलतात…, असं राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत सध्या चर्चेत आलं आहे. आमच्या पुढाऱ्यांना भानगडी पाहिजे असतात, भानगड केली नाही तर आमचं पोट भरत नाही, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत. ते जळगावमध्ये बोलत होते.
Published on: Mar 26, 2023 07:27 AM
Latest Videos
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?

