AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य

गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य

| Updated on: Sep 17, 2026 | 6:45 PM
Share

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारची बाजू मांडत विरोधकांच्या तुमसे ना हो पाएगा या टीकेला प्रत्युत्तर दिले. दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. शिंदेंनी शिवसेना वाचवल्याचा दावा करत, विरोधकांना आंदोलनासाठीही सक्षम नसल्याचे पाटील यांनी म्हटले. मात्र, बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्रीसाठी आजही सॉफ्ट कॉर्नर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी दुष्काळी परिस्थिती आणि शिवसेना फुटीच्या मुद्द्यांवरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. टीव्ही नाईनशी बोलताना पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाच्या तुमसे ना हो पाएगा या टीकेला सडेतोड उत्तर दिले. सरकार दुष्काळाशी आणि पाणीटंचाईशी मुकाबला करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, त्यांनी परतीच्या पावसासाठी गणपती बाप्पाला साकडे घातले. विरोधकांना उद्देशून पाटील म्हणाले की, आंदोलन करायलाही स्वभाव लागतो आणि आंदोलन करणारेच जर आता आमच्यासोबत असतील, तर आंदोलन करेल कोण? त्यांनी सध्याच्या विरोधी पक्षाला सक्षम नसल्याचे म्हटले. मागील काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोना असो वा नैसर्गिक आपत्त्या, प्रत्येक संकटात कसे काम केले, याचाही त्यांनी उल्लेख केला.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या जाहिरातींवरील टीकेला उत्तर देताना, कृतज्ञता व्यक्त करणे चुकीचे नसल्याचे पाटील यांनी नमूद केले. शिवसेना आणि पक्षचिन्हाबाबतच्या सुनावणीवर बोलताना, आम्ही पक्षाचे विचार सोडले नाहीत, उलट ते वाचवले असे पाटील यांनी ठामपणे सांगितले.

Published on: Sep 17, 2026 06:45 PM

Follow Us