कुठं जातोय महाराष्ट्र माझा? संताच्या भूमिक आज दंगली का? त्र्यंबकेश्वर मंदिर धूप प्रकरण आहे तरी काय?
त्र्यंबकेश्वर मंदिरात मुस्लीम धर्मातील व्यक्तींनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचं प्रकरण सध्या माध्यमांमध्ये चर्चेत आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार तरुणांना अटकही केल्याची माहिती समोर आली. त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करून तिथे धूप, चादर आणि फुले चढवण्याचा ते प्रयत्न करत होते, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे.
मुंबई : राज्यातील अनेक शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दंगली होताना दिसत आहे. त्यात अनेक ठिकाणी हे हिंदू-मुस्लिम अशा रंगाला पुढे आनले जात आहे. हाच कित्तीही नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रकरणात देखिल गिरवला जात आहे. त्यामुळे संताचा माझा महाराष्ट्र कुठं जातोय असा सवाल हा राज्याच्या जनतेत पडत आहे. मात्र राजकीय पक्ष आपआपल्या पोळ्या भाजून घेताना दिसत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात मुस्लीम धर्मातील व्यक्तींनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचं प्रकरण सध्या माध्यमांमध्ये चर्चेत आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार तरुणांना अटकही केल्याची माहिती समोर आली. त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करून तिथे धूप, चादर आणि फुले चढवण्याचा ते प्रयत्न करत होते, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. पण हे असं काही नसून धूप फिरवण्याची परंपरा असल्याचा मुस्लीम गटाचा दावा आहे. यानंतर ब्राह्मण महासंघाने पोलिसांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे देखील आदेश दिले. तर हिंदु महासभेने उडी घेतली आहे. तर महासभेकडून मंदिराचे शुद्धीकरण करत पुजणदेखील केले. त्यावरून आता टीका होत आहेत. शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांनी नेमलेल्या SIT वरूनही त्यांच्यावर जोरदार टीका केली. तर तुम्हाला जेथे जेथे मुस्लेम समाज जातो तेथे शुद्धीकरण करावं लागेल असा टोला त्यांनी लगावला आहे. तर देशात पुन्हा एकदा फाळणीचं बीज पेरत असल्याचा आरोप भाजपवर केला आहे. यादरम्यान भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी देखील एक व्हिडिओ शेअर करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत इशारा दिला आहे. भोसले यांनी, “हे भगवं सरकार आहे… इथे हिरव्यांची मस्ती चालणार नाही, उद्धव ठाकरेंसारख्या लेच्यापेच्या लोकांचे हे सरकार नाही..’ असं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकारण आता चांगलच तापलेलं आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट
Published on: May 18, 2023 07:06 AM
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
