AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थ्यांना भडकवल्याप्रकरणी Hindustani Bhau ला 3 दिवस कोठडी

विद्यार्थ्यांना भडकवल्याप्रकरणी Hindustani Bhau ला 3 दिवस कोठडी

| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 01, 2022 | 4:04 PM
Share

हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठकविरोधात (Vikas Pathak) धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच पोलीस हिंदुस्तानी भाऊला बांद्रा कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. ऑफलाईन परीक्षेच्या मागणीला घेऊन 31 जानेवारी रोजी हजारो विद्यार्थी धारावीमध्ये रस्त्यावर उतरले. यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराला घेराव घातला.

हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठकविरोधात (Vikas Pathak) धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच पोलीस हिंदुस्तानी भाऊला बांद्रा कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. ऑफलाईन परीक्षेच्या मागणीला घेऊन 31 जानेवारी रोजी हजारो विद्यार्थी धारावीमध्ये रस्त्यावर उतरले. यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराला घेराव घातला. प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार हिंदुस्तानी भाऊ याच्या आवाहनानंतरच विद्यार्थ्यांनी (Student) धारावीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली, असा आरोप केला जातोय. त्यानंतर आता पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. युट्युबर विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारावी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हिंदुस्तानी भाऊला बांद्रा कोर्टात हजर करण्याती शक्यात आहे. 31 जानेवारी रोजी धारावी नाईंटी फिट रोडवर विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेच्या निषेधार्थ रस्त्यावर मोठे आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या या गोंधळामुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला होता. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात म्हणून धारावी परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर आता धारावीमध्ये जो विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ हा या प्रकरणात मुख्य आरोपी असून त्याला आणि इतर काही लोकांना आरोपी बनवण्यात आलं आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना भडकवल्याप्रकरणी Hindustani Bhau ला 3 दिवस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Published on: Feb 01, 2022 03:44 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या