शिंदे गटाचं वरळीकडे विशेष लक्ष… नवरात्रोत्सवाचे बॅनर पाहिले का?
हिंमत असेल तर निवडणुकीला उभे राहून दाखवा, असे आव्हान दोन्ही गटाकडून करण्यात येतंय. त्यातच आदित्य ठाकरेंच्या वरळीवर शिंदे गटाचं विशेष लक्ष असल्याचं दिसून येतंय.
विनायक डावरुंग मुंबईः नवरात्रोत्सवात एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) टार्गेट वरळी असल्याचं विशेषत्वानं जाणवतंय. कारणही तसंच आहे. वरळीत म्हणजेच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या मतदार संघात जागोजागी एकनाथ शिंदे यांच्याकडून शुभेच्छांचे बॅनर्स (Banners) लावण्यात आले आहेत. विविध देवी मंडळांच्या बाहेर एकनाथ शिंदे यांचे बॅनर आज झळकत आहेत. गणेशोत्सव काळात शिंदे गटाकडून गणेश मंडळांना मोठ्या देणग्या देण्यात आल्या होत्या. आता नवरात्रोत्सवातदेखील एकनाथ शिंदे यांची खास बॅनरबाजी करण्यात येत आहे. आदित्य ठाकरे विरोधात एकनाथ शिंदे गटातील आमदार अशा राजकीय आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा सध्या चांगलाच रंगलाय. हिंमत असेल तर निवडणुकीला उभे राहून दाखवा, असे आव्हान दोन्ही गटाकडून करण्यात येतंय. त्यातच आदित्य ठाकरेंच्या वरळीवर शिंदे गटाचं विशेष लक्ष असल्याचं दिसून येतंय.
Published on: Sep 26, 2022 09:31 AM
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
