Divorce Alimony: घटस्फोटानंतर नवऱ्याला पोटगी मिळू शकते का?
घटस्फोटानंतर पतीला पत्नीकडून पोटगी मिळू शकते का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं सविस्तर उत्तर या व्हिडीओच्या माध्यमातून मिळू शकेल. आलोक मौर्य आणि ज्योती मौर्य यांच्या प्रकरणावरून हा प्रश्न चर्चेत आला आहे.
घटस्फोटानंतर सर्वसामान्यपणे पत्नीला पतीकडून पोटगी दिली जाते. परंतु पोटगीची मागणी पतीसुद्धा करू शकतो का, असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. यामागचं कारण म्हणजे आलोक मौर्य आणि ज्योती मौर्य यांची केस. ज्योती मौर्य यांनी आलोक यांना घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर पतीने तिच्याकडून पोटगीची मागणी केली आहे. अशातच कायदा काय म्हणतो, पोटगीसंदर्भातले नियम काय आहेत, याबद्दल विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. आलोक आणि ज्योती मौर्य यांनी हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न केलंय. त्यामुळे त्यांचा हा खटला हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलमांतर्गत येतो. या कायद्यात दोन महत्त्वाची कलमं आहेत, जे पतीला पोटगी मागण्याचा अधिकार देतात. यासंदर्भातील सविस्तर माहिती व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात..
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

