Brij Bhushan Singh समोर यूपीवाल्यांची महाराष्ट्राला खुली धमकी!

आजच्या खासदार बृजभूषण सिंह यांच्या एका कार्यक्रमानंतर त्यांच्या समोर एका कार्यकर्त्याने पाच तारखेला एकही मराठी दिसला तर त्याला शरयू नदीत बुडवून मारू अशी धमकीच दिली आहे. त्यामुळे जे महाराष्ट्रात घडलं ते उत्तर प्रदेशमध्ये होणार असेच चित्र दिसत आहे.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 26, 2022 | 8:15 PM

मुंबई : उत्तर भारतीयांना झालेल्या मारहानीवरून सध्या मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray)आणि उत्तर प्रदेशचे खासदार बृजभूषण सिंह (brijbhushan sharan singh) यांच्यात जोरदार लागली आहे. ज्यामुळे महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशमधील राजकारण तापले आहे. तर राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी जोरदार विरोध केला. तसेच राज ठाकरे यांनी माफी मागावी, मगच अयोध्येत यावं, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं होतं. तर त्यांना उंदीर असेही त्यांनी म्हटलं होतं. तसेच मी महाराष्ट्रात येणारच, रोक सके तो रोक लो असे आवाहान त्यांनी मनसे कार्यकर्ते आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिले आहे. आता त्यांच्या समोरच एकाने उत्तर प्रदेशमध्ये पाच तारखेला होणाऱ्या कार्यक्रमा दिवशी एकही मराठी दिसला तर त्याला शरयू नदीत (Sharyu river) बुडवून मारू अशी धमकीच दिली आहे. तसेच आपल्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी अर्धमेला होऊ पर्यंत मारलं होतं. ते आम्ही कसं विसरू असेही त्याने म्हटलं आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें