‘आरोपीला आज रात्रीपर्यंत अटक झाली नाही तर…’ – प्रवीण दरेकर
पोलिसांची भाषा आरोपींना पाठीशी घालणारी आहे, असं सांगतानाच आमचा कोणावर संशय आहे हे राजश्री पलांडे यांनी थेट सांगितलंय. पोलिसांनी प्रक्रिया सुरू केली आहे. अज्ञाताविरोधात तक्रार दाखल झाली आहे. कुठल्यातरी गर्दुल्याला पकडणार किंवा निर्दोष व्यक्तीला पकडणार असं चालणार नाही, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
मुंबई: भाजपच्या पोलखोल कँम्पेन (Bjp Pol Khol Campaign) रथावर चेंबूरमध्ये दगडफेक करण्यात आली आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. कोर्टात जाऊ असं ते म्हणत आहेत. कोणी दगड मारला तर तुम्ही कोर्टात जाता का? या घटनेतील आरोपीला आज रात्रीपर्यंत अटक झाली नाही तर उद्या भाजप (BJP) पुन्हा पोलीस स्टेशनला घेराव घालेल. पोलिसांची भाषा आरोपींना पाठीशी घालणारी आहे, असं सांगतानाच आमचा कोणावर संशय आहे हे राजश्री पलांडे यांनी थेट सांगितलंय. पोलिसांनी प्रक्रिया सुरू केली आहे. अज्ञाताविरोधात तक्रार दाखल झाली आहे. कुठल्यातरी गर्दुल्याला पकडणार किंवा निर्दोष व्यक्तीला पकडणार असं चालणार नाही, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

