Kokan Weather Update : थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार; हवामान खातं म्हणतंय, कोकणात पुढचे 5 दिवस…
कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. कोकणात पुढचे पाच दिवस पावसाचे असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. आज सकाळपासूनच रत्नागिरीत पावसाच्या दमदार सरी कोसळण्यास सुरूवात झाली.
गेल्या दोन दिवसांनंतरच्या विश्रांतीनंतर कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. कोकणात पुढचे पाच दिवस पावसाचे असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. आज सकाळपासूनच रत्नागिरीत पावसाच्या दमदार सरी कोसळण्यास सुरूवात झाली आहे. गटारी अमावस्येपर्यंत पावसाचा जोर हा कोकण किनारपट्टी भागात कायम राहणार आहे. आज सकाळपासून देखील दमदार सरी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात बरसल्या होत्या. पुढील काही दिवसांत किनारपट्टी भागात वेगवान वारे देखील वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तविली आहे. पुढच्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडल्यास पाऊस वार्षिक सरासरी पूर्ण करणार असून कोकण किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहण्याची देखील शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
Latest Videos
Latest News