AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rain Forecast : मुंबईकरांसाठी पावसासंदर्भात मोठी अपडेट, IMD चा अंदाज, पुढील तीन दिवस...

Mumbai Rain Forecast : मुंबईकरांसाठी पावसासंदर्भात मोठी अपडेट, IMD चा अंदाज, पुढील तीन दिवस…

| Updated on: Jun 13, 2024 | 1:45 PM
Share

Imd Monsoon Rain Forecast Maharashtra Weather Latest Update : मुंबईत तापमानाने उच्चांक गाठला होता मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण दिसत आहे. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे पडणाऱ्या हलक्या सरींच्या पावसाचा आनंद मुंबईकर मरीन ड्राईव्ह येथे घेत असून विकेंडला तरूण मंडळी गर्दी करताना दिसताय.

गेल्या आठवड्यापासून मुंबईत हलक्या सरींच्या पावसाला सुरूवात झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मुंबईकरांची कडाक्याच्या उकाड्यापासून काहीशी सुटका झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी मुंबईत तापमानाने उच्चांक गाठला होता मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण दिसत आहे. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे पडणाऱ्या हलक्या सरींच्या पावसाचा आनंद मुंबईकर मरीन ड्राईव्ह येथे घेत असून विकेंडला तरूण मंडळी गर्दी करताना दिसताय. अशातच मुंबईकरांसाठी हवामान खात्यानं पावसासंदर्भात एक अपडेट दिली आहे. पुढील तीन दिवस मुंबईत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून मुंबईत पडणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. दुसरीकडे हवामान बदलामुळे मुंबईमध्ये जुलै महिन्यात पावसाचे थैमान पाहायला मिळणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. इतकंच नाहीतर मुंबईत कमी वेळात जास्त पाऊस कोसळणार असेही सांगितले जात आहे.

Published on: Jun 13, 2024 01:40 PM