AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निळाशार अथांग समुद्र, चारही बाजूला निसर्गाची हिरवीगार उधळण; गणपतीपुळेची ही विहंगम दृश्य पाहिली नसतील तर...

निळाशार अथांग समुद्र, चारही बाजूला निसर्गाची हिरवीगार उधळण; गणपतीपुळेची ही विहंगम दृश्य पाहिली नसतील तर…

| Updated on: Jun 25, 2024 | 4:54 PM
Share

कोकणात पावसामुळे सर्वत्र वातावरण निसर्गरम्य झाले आहे. यामुळे पर्यटकांची पावले आता कोकणातील पर्यटनस्थळाकडे वळतांना दिसत आहे. कोकणातील समुद्र, जलदुर्ग आणि गणपतीपुळे या ठिकाणी पर्यटकांची गजबज वाढताना दिसतेय. बघा गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याची विहंगम दृश्य

कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक आहे. समुद्र देखील खवळलेला आहे. कोकण किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहत आहेत. गणपतीपुळे येथील मंदिर आणि किनारपट्टी भागात समुद्रात उंच लाटा निर्माण झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाच्या कोसळधारा सुरु आहे. रत्नागिरीत १ जूनपासून आजपर्यंत ५०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी देखील जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकणातील किनारपट्टी भागात पौर्णिमेनंतर समुद्रास उधाण आले आहे. समुद्राने रौद्ररूप धारण केले आहे. किनारपट्टी भागाला लाटांचा तडाखा बसत आहे. अशातच कोकणात पावसामुळे सर्वत्र वातावरण निसर्गरम्य झाले आहे. यामुळे पर्यटकांची पावले आता कोकणातील पर्यटनस्थळाकडे वळतांना दिसत आहे. कोकणातील समुद्र, जलदुर्ग आणि गणपतीपुळे या ठिकाणी पर्यटकांची गजबज वाढताना दिसतेय. अथांग पसरलेला निळाशार समुद्र, चारही बाजूला हिरवागार निसर्ग असं दृश्य मन मोहून टाकतंय. बघा गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याची विहंगम दृश्य

Published on: Jun 25, 2024 04:54 PM