Mumbai Rain : मुंबईत समुद्र खवळला… उंच लाटा, पावसाचा जोर वाढला तर मुंबईची होणार तुंबई, काय दिला इशारा?
मुंबईत लोकलने कामावर जाणाऱ्या प्रवाशांना या मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसताना दिसतोय. त्यामुळे ऑफिसला जाण्याच्यावेळीच मुंबईकरांना या पावसामुळे लेट धावणाऱ्या ट्रेनमुळे लेट मार्क लागण्याची चिंता असल्याने मनस्ताप सहन करावा लागतोय. तर मुंबईतील समुद्रात भरतीचा इशारा देण्यात आलाय
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. मुंबईत दुपारच्या वेळीदेखील ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मध्यरात्री, पहाटेपासून मुंबई, कल्याण, ठाणे या भागात मुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय. त्यामुळे सकाळच्या वेळात सखल भागात पाणी साचण्याच्या समस्या तसेच मुंबईत लोकलने कामावर जाणाऱ्या प्रवाशांना या मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसताना दिसतोय. त्यामुळे ऑफिसला जाण्याच्यावेळीच मुंबईकरांना या पावसामुळे लेट धावणाऱ्या ट्रेनमुळे लेट मार्क लागण्याची चिंता असल्याने मनस्ताप सहन करावा लागतोय. तर मुंबईतील समुद्रात भरतीचा इशारा देण्यात आला असून सव्वा 4 मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळण्याची शक्यता आहे. साडे 11 वाजता मुंबईतील समुद्रात भरतीचा इशारा देण्यात आला आहे. जर पाऊस वाढला तर मुंबईची तुंबई होण्याची शक्यता आहे.
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
