कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, कांद्याचे लिलाव पुन्हा बेमुदत बंद
नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने विविध मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. मात्र, निवेदन दिल्यानंतरही कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
नाशिक : 18 सप्टेंबर 2023 | ऐन गणेशोत्सव काळात लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यामध्ये कांद्याचे लिलाव पुन्हा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवार 20 सप्टेंबरपासून कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने विविध मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. मात्र, निवेदन दिल्यानंतरही कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तर, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनसोबतच्या बैठकीतही कुठला तोडगा निघाला नाही, त्यामुळे जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. कांदा लिलाव बंद ठेवण्यात येणार असल्याने किमान 30 ते 40 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

