Nashik | रिक्षाचालकाकडून 2 महिलांना जाळून मारण्याचा प्रयत्न, महिलांची प्रकृती गंभीर, घराचंही नुकसान

आरोपी रिक्षाचालक कुमावत हा गौड कुटुंबाचा परिचित असून त्याने भारती गौड यांना शिवीगाळ करत मारहाण सुरु केली. त्यानंतर काही वेळातच बाटलीत आणलेले पेट्रोल भारती गौड यांच्या अंगावर ओतले...

नाशिकमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका रिक्षाचालकाने महिलेला घरात घुसून मारहाण करत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या बहिणीला वाचवताना दुसरी महिलाही गंभीर जखमी झाली. आरोपी रिक्षाचालकही काही प्रमाणात भाजला आहे. सर्व जखमींवर  उपचार सुरु आहेत. दरम्यान संबधित चालकाने हे टोकाचं पाऊल उचलण्यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI