VIDEO : Beed | Parli मध्ये भाजपा आणि पंकजाताईंना मोठा धक्का
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या बीड दौऱ्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव आघाव यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे परळीमध्ये भाजपा आणि पंकजाताईंना मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या बीड दौऱ्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव आघाव यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे परळीमध्ये भाजपा आणि पंकजाताईंना मोठा धक्का बसला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी “माझ्या घरातील लोकांना माझ्यातले गुण कळले नाहीत” असा टोला लगावला. तर लोकसभेची जागा बीडमधून पुढील वेळेस राष्ट्रवादी निवडून आणणार, असा विश्वासही धनंजय मुंडेंनी बोलून दाखवला.परळी मतदारसंघात आमची पकड मजबूत आहे. 2014 च्या निवडणुकीत पडेल उमेदवाराला पवार साहेबांनी राज्याचं विरोधीपक्ष नेते पद दिलं, असे धनंजय मुंडे म्हणाले.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

