खासदार-आमदारांचा राजेशाही थाट, चांदीच्या थाळीत पंचपक्वान्नांचा बेत… चर्चेनंतर विधीमंडळ सूत्रानं म्हटलं ते ताट चांदीचं नाही तर…
सर्व राज्यातील अंदाज समितीच्या सदस्यांच्या राहण्याची सोय देखील पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली. इतकंच नाहीतर संसद तसंच विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांसाठी चक्क चांदीच्या थाळीतून पंचपक्वान्नांचा बेत केल्याची चर्चा होतेय
संसद आणि राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी मुंबईत दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षांसाठी, खासदार- आमदारांसाठी चक्क चांदीच्या थाळीत पंचपक्वान्नाचा बेत करण्यात आला. याकरता एका चांदीच्या थाळीचे भाडे ५५० रूपये तर भोजनाचा खर्च चार हजार रूपये करण्यात आल्याची माहिती आहे. तर अर्थसंकल्पातील तरतुदींचं उद्दिष्ट सध्या करण्यासाठी काटकसरीच्या शिफारशी करण्याची जबाबदारी ज्या अंदाज समितीवर असते, त्याच समितीच्या परिषदेत सदस्यांसाठी राजेशाही थाट केल्याचं बघायला मिळालं आहे. त्यामुळे राज्य निधीची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप केला जात असताना विधीमंडळ सूत्रांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. ‘ते ताट चांदीचं नाही. व्हाईट मेटल आर्टिफिशिअय ताट आहे’, असं विधीमंडळाचं म्हणणं आहे.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

