Jalgaon | टाळमृदुंगाच्या गजरात आदिशक्ती मुक्ताईची पालखी मुक्ताईनगरमधून निघाली पंढरीला

जळगावच्या मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाईची पालखी आषाढीवारी निमित्त सकाळी 4 वाजता मुक्ताईची  मंदिर प्रशासनाकडून महापूजा आणि अभिषेक करण्यात आला.

जळगाव : विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करत आदिशक्ती मुक्ताई पालखी टाळमृदुंगाच्या गजरात पंढरीला निघाली आहे. जळगावच्या मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाईची पालखी आषाढीवारी निमित्त सकाळी 4 वाजता मुक्ताईची  मंदिर प्रशासनाकडून महापूजा आणि अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मुक्ताबाई पालखी पादुका या मोजक्या वारकरी संप्रदायात प्रतिनिधीसमवेत 2 शिवशाही बसने पंढरपूरसाठी रवाना झाल्या. आरोग्य पथक आणि पोलीस बंदोबस्तात मोजक्या वारकरीसह दोन शिवशाही बसने मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI