Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या, सुसाईड नोट… अगोदर आरक्षण, मगच इलेक्शन
tv9 Marathi Special Report | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एकानं आत्महत्या केली आहे. आधी मराठा आरक्षण आणि मगच इलेक्शन असे सुसाईड नोटमध्ये लिहीत सुनिल कावळे यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. मुंबईच्या उड्डाण पुलावर ४५ वर्षाच्या सुनिल कावळे यांची आत्महत्या
मुंबई, २० ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एकानं आत्महत्या केली आहे. आधी मराठा आरक्षण आणि मगच इलेक्शन असे सुसाईड नोटमध्ये लिहीत सुनिल कावळे यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. मुंबईच्या उड्डाण पुलावर ४५ वर्षाच्या सुनिल कावळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनिल कावळे यांनी या आत्महत्येपूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांना सुसाईड नोट सुद्धा लिहिली होती. सुनिल कावळे हे जालन्यातील अंबड तालुक्यातील चिकणगाव येथे राहण्यास होते. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी एकच मिशन मराठा रक्षण, एक मराठा लाख मराठा, साहेब आता कोणत्याच नेत्याच्या सभेला जायचं नाही. ऑक्टोबर २४ लाच मराठा आरक्षण दिवस या मुंबईमध्येच आता माघार नाही. मी क्षमा मागतो, सर्वांनी मला माफ करावं, ही संधी सोडून नका आता मिशन एकच मराठा आरक्षण मगच इलेक्शन… बघा यावर मनोज जरांगे यांनी काय म्हटलं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

