AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amir Nazir Wani : दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई अन् बहिणीची तळमळ पण त्यानं ऐकलं नाही अखेर खात्मा; बघा VIDEO

Amir Nazir Wani : दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई अन् बहिणीची तळमळ पण त्यानं ऐकलं नाही अखेर खात्मा; बघा VIDEO

| Updated on: May 15, 2025 | 5:39 PM
Share

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना दहशतवाद्याने आत्मसमर्पण करावे अशी इच्छा होती परंतु असीफ अहमद शेख, आमीर नझीर वाणी, यावर अहमद भट्ट यांनी आत्मसमर्पण करण्याऐवजी सुरक्षा दलातील सैन्यावरच गोळीबार केला.

जम्मू-काश्मीरमधील त्राल येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा आज खात्मा करण्यात आला आहे. तिन्ही दहशतवाद्यांचे जैश-ए-मोहम्मदशी कनेक्शन होते आणि ते पुलवामाचे रहिवासी होते.  सुरक्षा दलाकडून जैशच्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं त्यामध्ये असीफ अहमद शेख, आमीर नझीर वाणी, यावर अहमद भट्ट याचा सहभाग आहे. अशातच या तीन दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो चकमकीपूर्वी त्याच्या आई आणि बहिणीशी व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसला. दहशतवादी आणि त्याच्या आई-बहिणीच्या संभाषणाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या दहशतवाद्याचे नाव आमीर नझीर वाणी असून तो त्याच्या आईशी आणि बहिणीशी बोलत असताना त्याकडे एके-४७ बंदूक दिसत आहे. आमीर नझीर वाणी या शेवटच्या व्हिडिओ कॉलवर बोलत असताना आमीरच्या आईने आणि त्याच्या बहिणीने त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले, परंतु त्याने त्याला नकार दिला आणि तो सैन्याला पुढे येऊ द्या मग मी बघतो, असं म्हणाला.

Published on: May 15, 2025 05:31 PM