‘ईडीकडून अनिल देशमुखांविरोधात लूकआऊट नोटीस जारी’, अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा दावा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) लूकआऊट नोटीस काढलेली आहे, असा दावा अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी केला आहे. देशमुखांना लवकरच अटक होणार, असं जयश्री पाटील म्हणाल्या आहेत.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) लूकआऊट नोटीस काढलेली आहे, असा दावा अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी केला आहे. देशमुखांना लवकरच अटक होणार, असं जयश्री पाटील म्हणाल्या आहेत. ईडीने 100 कोटींच्या कथित वसूली प्रकरणात लूकआऊट नोटीस काढलेली आहे. याआधी ईडीने देशमुखांना पाचवेळा समन्स पाठवलं होतं. मात्र, चौकशीला हजर न राहिल्याने आता लूकआऊट नोटीस काढण्यात आल्याचा दावा जयश्री पाटील यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या माजी गृहमंत्र्यांना खरंच अटक होणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. “100 कोटी रुपये खंडणी घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावली आहे. यामुळे आता देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही. लूकआऊट नोटीसनुसार अनिल देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत. त्याखेरीज देशभरातील विमानतळांनादेखील नोटीस गेली आहे. जेणेकरून देशमुख हे देश सोडून जाऊ शकणार नाहीत. तसा प्रयत्न त्यांनी केल्यास त्यांना विमानतळावरच थांबवले जाईल”, असं अ‍ॅड. जयश्री पाटील म्हणाल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI