Pune | पुण्यातील लाल महालात माँसाहेब जिजाऊंची जयंती उत्साहात
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राजमाता जिजाऊ यांची (Rajmata Jijabai) तारखेनुसार 424 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने आज पुण्यातील लाल महालात माँसाहेब जिजाऊंची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राजमाता जिजाऊ यांची (Rajmata Jijabai) तारखेनुसार 424 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हजारो शिवभक्त मॉं साहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा (Sindkhed Raja) येथे मोठी गर्दी करत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मॉं साहेब जिजाऊ जमोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याचे पहायला मिळत आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, मात्र त्यासाठी त्यांना मॉं साहेब जिजाऊ यांनी प्रेरित केले. जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची वाट दाखवली. याच प्रेरणेमुळे स्वराज्याचा पाया रचला गेला. शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रात प्रजेचे हाल सुरू होते. सातत्याने मुस्लीम आक्रमणे होत असत. या य़ुद्धाची झळ ही प्रजेला अधिक बसत होती. पिकाने बहरेली शेतजमीन उद्धवस्त होत होती. मात्र शिव जन्मानंतर हे चित्र हळूहळू पटलू लागले. जिजाऊंच्या (Jijau Birth Anniversary) संस्कारात शिवाजी महाराजांचे संगोपन झाले आणि यातूनच त्यांना आपल्या दीनदुबळ्या शोषीत कष्टकरी प्रजेसाठी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली. दरम्यान, आज पुण्यातील लाल महालात माँसाहेब जिजाऊंची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
Published on: Jan 12, 2022 02:02 PM
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

