Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jitendra Janawale Video : ठाकरेंना पहिली 'मशाल' देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? थेट नेत्यांची नावं घेत केला संताप व्यक्त

Jitendra Janawale Video : ठाकरेंना पहिली ‘मशाल’ देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? थेट नेत्यांची नावं घेत केला संताप व्यक्त

| Updated on: Feb 18, 2025 | 5:51 PM

मुंबईतून विलेपार्ल्याचे उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे हे येत्या 20 फेब्रुवारीला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. जितेंद्र जनावळे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतून विलेपार्ल्याचे उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच त्यांनी उपविभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला असून येत्या 20 फेब्रुवारीला ते शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत. ‘माझ्या विभागात माझी राजकीय कोंडी करण्यात आली. माझं घर नोकरी गेली तरी मी पक्षासाठी जिद्दीने उभा राहिलो. माझं नुकसान झालं तरी मी उद्धव ठाकरेंकडे कधी आलो नाही. पण आता माझ्यावर न्याय मागण्याची ती वेळ आली आहे. मला घाणेरड्या राजकारणाचा कंटाळा आलाय. विलेपार्ले विधानसभेबाबत निर्णय घेणारे अनिल परब, संजय राऊत कोण?’, असा सवाल जितेंद्र जनावळे यांनी केलाय. पुढे ते असेही म्हणाले, माझ्या शिवसेनाप्रमुखांची विलेपार्ले विधानसभा यांनी आम आदमी पार्टीला दिली. त्यावेळी आम्ही उद्धव ठाकरेंना भेटून ठामपणे सांगितलं झाडूचा प्रचार करायला आमचा विरोध आहे. मशालकडे ही विधानसभा घ्या. लढून जिंकायच आहे. तर संजय राऊत आणि अनिल परब हे विलेपार्लेबाबत निर्णय घेणारे कोण? असा आक्रमक सवाल करत जितेंद्र जनावळे यांनी संताप व्यक्त केला.

Published on: Feb 18, 2025 05:51 PM