Ganesh Chaturthi 2021 | मुंबईतल्या लालबाग राजाच्या मंडपाजवळ पत्रकारांना धक्काबुक्की

लालबागचा राजा मंडप हा वादाचं केंद्र बनलंय का असा प्रश्न आहे. कारण कधी कार्यकर्त्यांची तर कधी पोलिसांची अरेरावी या परिसरात पाहायला मिळते. आता तर पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी तर एखाद्या गुंडाप्रमाणे अरेरावी केली. स्वत: मास्क न घालता संजय निकम यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. मीडियाकर्मींनी पोलीस निरीक्षक संजय निकम यांना प्रेमाने, समजुतीने बोलण्यासं सांगितलं, त्यावेळी त्यांना पारा आणखी चढला. 

धक्काबुक्की करताना पत्रकारांनी संजय निकम यांना हात लावू नका असं बजावलं. त्यावेळी या अधिकाऱ्याने हात काय पाय सुद्धा लावून दाखवतो थांब अशी गुंडगिरीची भाषा केली. पोलिसांच्या या वर्तनामुळे राज्याचे गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कायदा राखणाऱ्यांनी अरेरावी केली तर विचारायचं कुणाला हा प्रश्न सर्वसामान्यांना आहे. याप्रकरणाचा आम्ही निषेध करतो, झाल्याप्रकाराची चौकशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी करावी, मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालावं अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI