CJI Justice Bhushan Gavai : महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
New CJI Justice Bhushan Gavai Oath : महाराष्ट्राचे पुत्र न्यायाधीश भूषण गवई यांना देशाचे 52वे सरन्यायाधीश होण्याचा मान मिळाला आहे. या पदावर बसणारे ते दुसरे दलित व्यक्ती आहेत.
महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले न्यायाधीश भूषण गवई यांनी आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे. ते देशाचे 52 वे सरन्यायाधीश झाले आहेत. तर सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे गवई हे दुसरे व्यक्ती आहेत. काल सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर आजपासून भूषण गवई हे यापदावर विराजमान होणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नव्या सरन्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गवई यांचा कार्यकाळ 7 महिन्यांचा असणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपराष्ट्रपती जगडीप धनखड यांच्यासह केंद्रातल्या प्रमुख नेत्यांची या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती होती. शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषण गवई यांचं अभिनंदन केलं.
दरम्यान,जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द करून विशेष दर्जा रद्द करण्याचे समर्थन करणाऱ्या खंडपीठाचा भूषण गवई भाग होते. त्याचबरोबर 2016 च्या नोटाबंदीला घटनात्मक आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य घोषित करणाऱ्या खंडपीठाचेही ते सदस्य होते.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?

