Kalyan | घरात घुसून महिलांना मारहाण, अल्पवयीन चोरटे गजाआड, सीसीटीव्ही कैद
माघी गणेश विसर्जनाच्या वेळी सारिका चव्हाण यांनी गळ्यात घातलेले महागडे दागिने बघून या दोन अल्पवयीन मुलांची नियत फिरली. यानंतर या मुलांनी रात्री त्यांच्या घरात घुसखोरी करत सारिका आणि त्यांची आई वत्सला यांना बेदम मारहाण करुन दागिने घेऊन पसार झाले. दोन अल्पवयीन मुलांपैकी एकाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे.
कल्याण : एका महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण करीत दागिने (Jewelery) लंपास करणाऱ्या अल्पवयीन दुकलीला खडकपाडा पोलिसां(Khadakpada Police)नी ताब्यात घेतले आहे. दोघांचीही बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वत्सला देशमुख आणि सारिका चव्हाण अशी मारहाण करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. मारहाणीत या दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माघी गणेश विसर्जनाच्या वेळी सारिका चव्हाण यांनी गळ्यात घातलेले महागडे दागिने बघून या दोन अल्पवयीन मुलांची नियत फिरली. यानंतर या मुलांनी रात्री त्यांच्या घरात घुसखोरी करत सारिका आणि त्यांची आई वत्सला यांना बेदम मारहाण करुन दागिने घेऊन पसार झाले. दोन अल्पवयीन मुलांपैकी एकाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे.
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
