KDMC Dahi Handi 2025 : कल्याण-डोंबिवलीत 325 दहीहंड्यांचा जल्लोष; शिंदे अन् ठाकरे गटाच्या हंड्या आमने-सामने
अनेक दिवसापासून सराव करणारे गोविंदा आज मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटणार असून गोविंदाच्या सुरक्षेसाठी अनेक सार्वजनिक आणि खासगी मंडळाकडून जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे.
मुंबई, ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत देखील दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. कल्याण-डोंबिवलीमध्ये तब्बल ३२५ दहीहंड्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी चौकातील एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटाची दहीहंडी समोरासमोर असल्याने विशेष आकर्षण ठरणार आहे. यंदा कल्याण-डोंबिवलीत खासगी २७५ आणि सार्वजनिक अशा ५० दहीहंडी मिळून एकूण ३२५ दहीहंड्या फोडल्या जाणार आहेत. अशात दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी राजकीय नेते आणि सेलिब्रिटींची उपस्थिती देखील असणार आहे. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी चौक हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे आज दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी होणार असल्याने गर्दीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहेत तर ६०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आलाय.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

