Omicron | मास्क वापरणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळलं तर नागरिकांनी घाबरुन जाण्याचं कारण नाही : विजय सूर्यवंशी

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आत्तापर्यंत कल्याण डोंबिवलीत 294 नागरिक परदेशातून आले आहेत, अशी माहिती दिली.त्यापैकी जवळपास 70 लोकांची कोरोना चाचणी झाली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आत्तापर्यंत कल्याण डोंबिवलीत 294 नागरिक परदेशातून आले आहेत, अशी माहिती दिली.त्यापैकी जवळपास 70 लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. त्यापैकी आत्तापर्यंत 7 नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत. या 7 पैकी साऊथ आफ्रिकेहून आलेल्या एकाला ओमीक्रॉंन व्हेरियंटची लागण झाली आहेत. नायजेरियाहून आलेलं एक कुटुंब ज्यात नवरा, बायको, दोन मुलं कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 7 पॉझिटिव्ह पैकी एक जण नेपाळ आणि एक जण रशियाहून आलेले आहेत. कल्याण डोंबिवलीकरांनी घाबरून जाऊ नका, परंतु संभाव्य धोका पाहता पुरेपूर काळजी घ्या, असं आवाहन डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केलंय. ज्यांचं लसीकरण झालं नसेल त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्या, असं सूर्यंवशी म्हणाले. लसीकरण झालं असेल तर कोरोनाचा धोका कमी हे ओमिक्रॉंन बाधिताच्या हायरिस्क कॉन्टॅक्ट मधून समोर आलं आहे.

Published On - 2:18 pm, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI