AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतांचा अचानक यू-टर्न! आता म्हणाल्या...

Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतांचा अचानक यू-टर्न! आता म्हणाल्या…

| Updated on: Aug 07, 2026 | 3:58 PM
Share

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी Gen Z अर्थात तरुण पिढीवर केलेल्या वक्तव्यामुळे कंगना यांच्यावर मोठी टीका झाली होती. त्यांनी Gen Z ला ‘गटर पिढी’ असे संबोधत या पिढीवर जोरदार निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियासह विविध स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र, आता कंगना राणौत यांच्या भूमिकेत अचानक मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी Gen Z आणि विद्यार्थी आंदोलकांच्या प्रश्नांवर भूमिका मांडल्यानंतर कंगना यांनीही तरुण पिढीबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी Gen Z वर टीका करणाऱ्या कंगना यांनी आता याच पिढीला थेट देशाची ताकद आणि देशाचा वारसा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कंगना यांच्या या बदललेल्या भूमिकेची राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मोहन भागवत यांनी तरुण पिढीवर विश्वास व्यक्त करत, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी रास्त असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांच्या प्रश्नांवर संवादातून तोडगा काढण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर कंगना राणौत यांनी Gen Z बाबत आपली भूमिका मांडली.

कंगना राणौत म्हणाल्या की, “जनरेशन Z ही आपल्या देशाची ताकद आहे आणि एका अर्थाने आपल्या देशाचा एक मोठा वारसा आहे.” मोहन भागवत यांचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा, विचारांचा आणि अनुभवाचा देशाला अनेकदा लाभ झाल्याचे सांगितले.

पुढे कंगना यांनी देशातील युवा पिढीचे कौतुक करत, “देशातील युवा पिढी आपल्या समृद्ध संस्कृतीचे प्रतिनिधी आणि राजदूत म्हणून पुढे येत आहे, ही अत्यंत आनंदाची, समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे,” असे म्हटले.

काही दिवसांपूर्वी Gen Z वर कठोर शब्दांत टीका करणाऱ्या कंगना यांनी आता याच पिढीचे कौतुक केल्याने त्यांच्या वक्तव्याची विशेष चर्चा होत आहे. कंगना यांचा हा 360 डिग्री यू-टर्न नेमका का? असा सवालही सोशल मीडियावर उपस्थित केला जात असून, त्यांच्या नव्या वक्तव्याचा व्हिडीओही चर्चेत आला आहे.

Published on: Aug 07, 2026 03:58 PM

Follow Us