करुणा शर्मांचे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या…
धनंजय मुंडेंनी विधानसभेसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात पत्नी म्हणून आपला उल्लेख केला नसल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी परळी न्यायालयात दाद मागितली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला, असा दावाही त्यांनी केला. आज न्यायाधीशांच्या व्यस्ततेमुळे सुनावणी पुढे ढकलली असून, आता ६ तारखेला पुढील तारीख देण्यात आली आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेच्या वेळी दाखल केलेल्या शपथपत्रात पत्नी म्हणून आपला उल्लेख केला नसल्याचा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी परळी न्यायालयात दाद मागितली असून, आज या प्रकरणाची सुनावणी होणार होती. तथापि, न्यायाधीशांच्या व्यस्ततेमुळे ती ६ तारखेला पुढे ढकलण्यात आली आहे.
करुणा शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, धनंजय मुंडेंनी शपथपत्रात खोटी माहिती दिली आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला. “माझ्या नाव बायको असताना माझे नाव टाकलेले नाही, माझ्या मुलाबाळांचे नाव टाकले आहे,” असे त्या म्हणाल्या. तसेच, त्यांच्या मते, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्येही त्यांचे नाव नव्हते, परंतु आता २०२४ मध्ये केवळ मुलाबाळांची नावे दिली जात आहेत, तर आईचे नाव वगळले जात आहे. या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठातही निवेदन देण्यात आले असून, निवडणूक अधिकाऱ्यांनाही पक्षकार करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून धनंजय मुंडे यांचा अर्ज वैध ठरवला आणि आपला अर्ज अवैध ठरवला, असा करुणा मुंडे यांचा दावा आहे.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली

